• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चिन्या जगताप खून प्रकरणी तत्कालीन जेलर पोलिसांना शरण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 29, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चिन्या जगताप खून प्रकरणी तत्कालीन जेलर पोलिसांना शरण

जळगाव | दि. २९ जुलै २०२४ | येथील जिल्हा कारागृहात २०२१ साली चिन्या जगताप खून प्रकरणी दाखल खुनाच्या गुन्ह्यामध्ये जवळपास तीन वर्षांपासून फरार तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हा संशयित आरोपी सोमवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला शरण आला आहे.

जिल्हा कारागृहामध्ये बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याला ठेवण्यात आले होते. तत्कालीन कारागृह अधीक्षक पेटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत या आरोपींनी केलेल्या मारहाणीत जिल्हा कारागृहात ११ सप्टेंबर २०२० रोजी चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. २०२१ साली तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याच्यासह चौघांनी त्याला बेदम मारहाण करून खून केला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील इतर चार संशयित आरोपी तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी, कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांना यापूर्वी अटक झाली आहे. तर सर्व पाचही जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे.

या प्रकरणांमध्ये फिर्यादीला अनेक वेळा न्यायालयात दाद मागावी लागली आहे. या प्रकरणात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हा फरार होता. दरम्यान आज सोमवारी दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पेट्रस गायकवाड (रा. विद्यानगर, पुणे) हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला शरण आला आहे. त्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अटकपूर्व तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.

Next Post
तापी पाटबंधारे विकास महामंडळमधील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन

तापी पाटबंधारे विकास महामंडळमधील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add