मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या

जिल्हा परिषदेतर्फे आयोजन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

जळगाव, प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील. कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम, लोकसभा सदस्य स्मिता वाघ, विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे, सत्यजित तांबे, नंदकिशोर महाजन, तसेच आमदार सुरेश भोळे (राजूमामा), किशोर दराडे, किशोर पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील आणि मंगेश चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोनोने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अक्लाडे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी व ग्रामपंचायत विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने आयोजित या जिल्हास्तरीय कार्यशाळेत जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.








