• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 21, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव, प्रतिनिधी : मागील वेळी या परिसरात आलो होतो, तेव्हा नागरिकांना रस्त्याचे काम मंजूर करून देण्याचा शब्द दिला होता. आज त्याच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना मनापासून समाधान वाटत आहे. लोकांचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून दिलेला शब्द पाळण्यातच लोकप्रतिनिधी म्हणून खरे समाधान आहे. रस्त्याचे काम दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश देतानाच पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत “स्मशानभूमीच्या बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, तत्काळ मंजुरी देऊ,” अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ व १० मधील पिंप्राळा-निमखेडी परिसरातील शिवरोड येथील रस्ते व गटारींच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. २१) उत्साहात पार पडले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती ड्रा चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ वाढवून कामांचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून हाती घेण्यात आलेल्या या कामांना मागील वर्षी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंजुरी दिली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिता वाघ तसेच महापौर व उपमहापौर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मूलभूत सुविधांच्या विविध कामांना महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

शहराचा विकास टप्प्याटप्प्याने- आ. राजूमामा भोळे
यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. सध्या दुष्काळाची परिस्थिती असली तरी उपलब्ध निधी आणि प्राधान्यक्रमानुसार शहरातील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले, तर आभार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मानले. या भूमिपूजन सोहळ्यास महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा गटनेते विष्णू भंगाळे, स्थायी समिती सदस्य तथा भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक गणेश सोनवणे, आशुतोष पाटील, कुंदन काळे, सुरेश सोनवणे, माधुरी बारी, जाकिर खान, कविता भोई, कविता पाटील, अमर जैन, नरेंद्र पाटील, मानसी भोईटे व जयश्री पाटील यांच्यासह महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता मनोज वनेरे, स्थानिक पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


 

ताज्या बातम्या

पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

November 21, 2026
केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव
जळगाव जिल्हा

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 21, 2026
नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक
गुन्हे

नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक

November 21, 2026
१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
जळगाव जिल्हा

१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

November 21, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
खान्देश

पार्किंगमधून एक लाखांची रोकड लंपास

November 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add