• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

दुसर्याच दिवशी डिस्चार्ज, शासकीय योजनेतून मोफत उपचार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 21, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, प्रतिनिधी : कंबरदुखीसह डाव्या पायात तीव्र वेदना, मुंग्या आणि बधिरपणामुळे चालणेही कठीण झालेल्या ४८ वर्षीय रुग्णावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेत केवळ दोन टाके घेण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पायातील ताकद वाढली, वेदना व मुंग्या पूर्णपणे थांबल्या आणि दुसर्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

संबंधित ४८ वर्षीय पुरुष रुग्ण मागील एक महिन्यापासून कंबरदुखी आणि डाव्या पायात पसरणार्या तीव्र वेदनांनी त्रस्त होता. कंबरदुखीपेक्षा पायातील वेदना अधिक तीव्र होत्या. डाव्या पायात मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे तसेच अवघे १०० मीटर चालल्यानंतर चालण्यास त्रास होणे, अशा तक्रारी होत्या. तपासणीमध्ये डाव्या पायातील स्नायूंची ताकद कमी झाल्याचे आढळले. विशेषतः घोटा आणि पायाच्या अंगठ्याची हालचाल करणार्या स्नायूंची ताकद ३/५ इतकी कमी झाली होती.

एमआरआय लंबर स्पाइन तपासणीत एल ४-एल ५ आणि एल ५-एस१ या दोन मणक्यांमधील डिस्क सरकल्याचे ( पीआयव्हीडी प्रोलॅप्स्ड इंटरव्हर्टेब्रल डिस्क ) निदान झाले. त्यामुळे नसांवर दबाव निर्माण होऊन पायात वेदना, मुंग्या आणि स्नायूंची ताकद कमी होण्याचा त्रास होत होता.रुग्णाची अवस्था लक्षात घेऊन महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे एंडोस्कोपिक डिकंप्रेशन, लॅमिनेक्टॉमी आणि डिस्केक्टॉमी (लॅमिनेक्टोमी आणि डिस्केक्टोमीसह एंडोस्कोपिक डिकंप्रेशन) ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे छोट्या छेदातून मणक्याच्या भागात पोहोचून नसांवरील दबाव कमी करणे आणि सरकलेली डिस्क काढणे शक्य झाले. शस्त्रक्रियेसाठी केवळ दोन टाके घेण्यात आले.ही शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. विपुल राठोड आणि डॉ. अतुल जाधव यांनी केली.डॉ. श्रुती खंडागळे व डॉ. प्रीतम दास यांनी सहकार्य केले. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. बऱ्हाटे यांनी जबाबदारी सांभाळली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या डाव्या पायातील स्नायूंची ताकद वाढली. पायातील वेदना, मुंग्या आणि बधिरपणाचा त्रास थांबला. रुग्णाला चालण्यातही सुधारणा जाणवली. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने दुसर्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.विशेष म्हणजे, या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला. अत्याधुनिक एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचा लाभ आर्थिक भाराविना मिळाल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला.लहान छेद, केवळ दोन टाके आणि जलद रिकव्हरी हे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, मणक्याच्या आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी आधुनिक उपचारपद्धतीचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरत आहे. डॉ. विपुल राठोड यांनी सांगितले.


 

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 21, 2026
नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक
गुन्हे

नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक

November 21, 2026
१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
जळगाव जिल्हा

१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

November 21, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
खान्देश

पार्किंगमधून एक लाखांची रोकड लंपास

November 20, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; तीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Uncategorized

जळगाव जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; तीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

November 20, 2026
पिस्तुल घेऊन दहशत माजविणारा जेरबंद
गुन्हे

पिस्तुल घेऊन दहशत माजविणारा जेरबंद

November 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add