• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

​जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनादरम्यान मंजूर करून घेतलेल्या निधीतून शहरातील शिव कॉलनी स्टॉप ते शंभर फुटी रोडपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी रस्ता कामाचे भूमिपूजन श्रीराम रथोत्सवाच्या शुभमुहूर्तावर आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. संपूर्ण वाघनगर परिसर, पीरबाबा दर्गा आणि गाडगेबाबा चौकाला जोडणारा हा मार्ग शहराच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार असून, खऱ्या अर्थाने हा प्रकल्प शहरासाठी एक ‘मिनी रिंग रोड’ असेल, असे प्रतिपादन आ. राजुमामा भोळे यांनी यावेळी केले.

​या निधीच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांचे अमूल्य सहकार्य लाभल्याचे आ.भोळे यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत ज्या ठिकाणी भूमिगत गटारांचे काम अद्याप बाकी आहे, ते येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येईल आणि ते पूर्ण होताच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

केवळ रस्ता तयार करणे हा उद्देश नसून नागरिकांना दर्जेदार रस्ते, चांगल्या सुविधा आणि नियोजनबद्ध विकास उपलब्ध करून देणे हेच आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची वाहतुकीची मोठी सोय होणार असून शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

​या भूमिपूजन सोहळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे, संतोष पाटील, अमृता सोनवणे आणि प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, अंकिता पाटील व विशाल भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच शिवकॉलनी परिसरातील प्रा. डॉ. नितीन बारी, मनोज सावंत, मनोज भांडारकर, बंटी नेरपगारे, भिकन हिवराडे, योगेश पाटील, मनोज देवरे, आनंद साळी, संदीप जगताप, प्रीतम गुजर, फकिरा वाणी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

ताज्या बातम्या

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

November 22, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप
कृषी

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 22, 2026
व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका
आरोग्य

व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका

November 21, 2026
पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

November 21, 2026
केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव
जळगाव जिल्हा

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add