• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्डसारख्या प्रदर्शनांमधून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार : पद्मश्री चैत्राम पवार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 22, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

जळगाव, प्रतिनिधी : शेतीतील बदलते तंत्रज्ञान, आधुनिक कृषी यंत्रे आणि नव्या प्रयोगांची माहिती घेण्यासाठी ॲग्रोवर्ल्ड राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमधून तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशातून हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती नोंदविली. शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे सुरू असलेले हे प्रदर्शन सोमवार दि.२३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

शेती क्षेत्रात सातत्याने बदल होत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास उत्पादनक्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. ॲग्रोवर्ल्डसारख्या प्रदर्शनांमधून कृषी ज्ञानाचा प्रसार होतो. शेतीतील नवे बदल प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांचा उपयोग समजून घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागतो, असे प्रतिपादन पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले.

महिला बचत गटांनीही बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले पाहिजेत. पारंपरिक शेतीपुरते मर्यादित न राहता कृषिमाल प्रक्रिया उद्योगांकडे वळण्याची गरज आहे. त्यातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असेही श्री. पवार यांनी नमूद केले.

ॲग्रोवर्ल्डच्या वतीने जिल्ह्यातील २७ महिला शेतकरी गटांना ‘आदर्श महिला गट शेती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवृत्त कृषी अधिकारी अनिल भोकरे, पाणी फाउंडेशनचे समन्वयक राकेश हिवरे, मेट्रोजन बायाचे प्रियंक शहा, मत्स्यसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, कृषिदूत बायोचे डॉ. रामनाथ जगताप, सातपुडा ऑटोचे डी. डी. बच्छाव आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी. डी. जडे, डीआरपी समाधान पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाच्या आजवरच्या वाटचालीची माहिती दिली. वंदना कोर्टीकर यांनी सूत्रसंचालन केले.

२२० स्टॉल्समधून शेतीचे आधुनिक पर्याय..
प्रदर्शनात २२० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे ४० स्टॉल्सवर लहान-मोठी कृषी यंत्रे आणि अवजारांची माहिती व प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. बदलते हवामान, मजूरटंचाई, पाण्याची उपलब्धता आणि उत्पादन खर्च या शेतकऱ्यांसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान येथे पाहायला मिळत आहे.

फवारणीसाठी ड्रोन, आधुनिक कृषी यंत्रे, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पद्धती, करार शेती, टिश्यूकल्चर केळीच्या १२ हून अधिक कंपन्या, फळे-भाजीपाला रोपवाटिका, सुधारित बियाणे आणि नॅनो फर्टिलायझर यांचा समावेश आहे. याशिवाय शेततळ्यांचे अस्तरीकरण, सोलर फार्मिंग, शेततार कुंपण, झटका मशीन, किचन गार्डन टूल्स तसेच परसबाग आणि टेरेस गार्डनसाठी विविध रोपे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना बँकिंग सुविधा, शासकीय योजना, कृषी विभागाचे अनुदान आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रदर्शनाला विशेष प्रतिसाद मिळत आहे.

मका हार्वेस्टरकडे शेतकऱ्यांचे लक्ष..
प्रदर्शनातील मका कंबाईन हार्वेस्टर हे यंदाचे विशेष आकर्षण ठरत आहे. जळगावमध्ये पहिल्यांदाच या यंत्राचे प्रदर्शन करण्यात आले असून, मजुरांअभावी शेतीकामात येणाऱ्या अडचणींवर हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे या यंत्राची माहिती घेण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.
याशिवाय कृषी स्टार्टअप, कृषी प्रक्रिया उद्योग, फळे व भाजीपाला सोलर ड्रायर, पापड निर्मिती उद्योग आणि पशुपालकांसाठी शेण उचलण्याची ट्रॉली यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.


 

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप
कृषी

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 22, 2026
व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका
आरोग्य

व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका

November 21, 2026
पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

November 21, 2026
केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव
जळगाव जिल्हा

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 21, 2026
नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक
गुन्हे

नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक

November 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add