• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. कमलेश तायडे यांच्या उपचारांना यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 22, 2026
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

जळगा, प्रतिनिधी :अचानक आलेले झटके, त्यानंतर बिघडलेले मानसिक संतुलन आणि गंभीर बनलेली प्रकृती... अशा आव्हानात्मक परिस्थितीत असलेल्या २० वर्षीय तरुणीला योग्य निदान आणि वेळेवर केलेल्या उपचारांमुळे नवजीवन मिळाले आहे. 

जळगाव येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. कमलेश तायडे यांनी या तरुणीवर यशस्वी उपचार केले. ऑटोइम्यून एन्सेफलायटिस या गंभीर मेंदूविकारातून तरुणी पूर्णपणे बरी झाल्याने वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.संंधित २० वर्षीय तरुणीला अचानक तीव्र स्वरूपाचे झटके येण्यास सुरुवात झाली.

 प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने जळगाव येथील महादेव रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. कमलेश तायडे यांनी तरुणीची सविस्तर तपासणी केली. मेंदूची एमआरआय तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, एमआरआय तपासणीचा अहवाल सामान्य आला असला, तरी रुग्णाची लक्षणे गंभीर होती. त्यामुळे केवळ एमआरआय अहवालावर अवलंबून न राहता लक्षणांचा सखोल अभ्यास करण्यात आला. तरुणीला सतत झटके येत असल्याने वैद्यकीय तपासणीत ’स्टेटस एपिलेप्टिकस’ या गंभीर स्थितीचे निदान झाले. ही मेंदूशी संंधित वैद्यकीय आणीबाणीची अवस्था असून, झटके दीर्घकाळ सुरू राहिल्यास मेंदू आणि शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

त्यामुळे तिला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून आवश्यक औषधोपचार सुरू करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार केल्यानंतर झटके नियंत्रित करण्यात यश आले.मात्र, झटके थांबल्यानंतरही उपचारांचे आव्हान संपले नव्हते. तरुणीच्या मानसिक संतुलनात बिघाड झाल्याचे दिसून आले. तिच्या वर्तनात आणि मानसिक स्थितीत बदल झाल्याने डॉक्टरांनी अधिक सखोल तपासणी व निरीक्षण केले. या सर्व लक्षणांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर तिला ’ऑटोइम्यून एन्सेफलायटिस’ हा आजार असल्याचे निदान झाले.या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून मेंदूतील पेशींवर हल्ला करते. त्यामुळे रुग्णाला झटके येणे, स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक संतुलन बिघडणे, वर्तनात बदल होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन तरुणीला आवश्यक औषधोपचार देण्यात आले. 

उपचारादरम्यान तिच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. कमलेश तायडे यांच्यासह डॉ. हितेश मोरे, डॉ. आशिक शेख यांनी केलेल्या उपचाराला यश आले आणि तरुणीने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि ती पूर्णपणे बरी झाली. गंभीर मेंदूविकारातून तरुणी सुखरूप बाहेर आल्याने तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
ऑटोइम्यून एन्सेफलायटिस हा तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा मेंदूविकार आहे. या आजारात सुरुवातीला झटके येणे, मानसिक स्थितीत बदल होणे किंवा वर्तनात अनपेक्षित बदल दिसू शकतात. काही वेळा एमआरआय तपासणी सामान्य असली तरी रुग्णाची लक्षणे गांभीर्याने घेऊन पुढील तपासणी करणे आवश्यक असते. वेळेवर अचूक निदान, योग्य उपचार आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख यामुळे अशा रुग्णांना बरे होण्यास मदत होऊ शकते.- डॉ. कमलेश तायडे, मेंदू विकार तज्ज्ञ, महादेव 

 

ताज्या बातम्या

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा
जळगाव जिल्हा

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा

November 22, 2026
सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट
खान्देश

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

November 22, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या

November 22, 2026
जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

November 22, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप
कृषी

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add