• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्समध्ये जळगावच्या धावपटूंची चमकदार कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 22, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

जळगाव,प्रतिनिधी : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ७ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धेत ‘जळगाव रनर्स ग्रुप’चे धावपटू अतुलसिंह हाडा आणि संजय मोती यांनी नेत्रदीपक यश संपादन करत जळगावचा नावलौकिक उंचावला आहे. या स्पर्धेत अतुलसिंह हाडा यांनी कांस्य, तर संजय मोती यांनी रौप्य पदकाची कमाई केली असून, या दोघांचीही आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो खेळाडू सहभागी झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत जळगावच्या धावपटूंनी आपला दबदबा कायम राखला. ५०+ (पन्नास वर्षांवरील) वयोगटात झालेल्या ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अतुलसिंह हाडा यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक जिंकले. तसेच, १० किलोमीटर धावण्याच्या खडतर स्पर्धेत संजय मोती यांनी उत्कृष्ट वेळेची नोंद करत द्वितीय क्रमांक पटकावला आणि रौप्य पदकाचे मानकरी ठरले.

नागपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
राज्यस्तरीय स्पर्धेतील या दमदार कामगिरीच्या जोरावर अतुलसिंह हाडा आणि संजय मोती हे दोन्ही खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. येत्या ८ ते १० जानेवारी २०२७ दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल जळगाव रनर्स ग्रुपच्या सदस्यांसह शहरातील क्रीडा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


 

ताज्या बातम्या

धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
खान्देश

धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

November 22, 2026
मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा
जळगाव जिल्हा

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा

November 22, 2026
सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट
खान्देश

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

November 22, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या

November 22, 2026
जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

November 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add