• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवारंगचे विजेतेपद मू.जे. ला तर प्रताप महाविद्यालय उपविजेता

समारोपाला सुरभी हांडे ची विशेष उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 11, 2023
in शैक्षणिक
0
युवारंगचे विजेतेपद मू.जे. ला तर प्रताप महाविद्यालय उपविजेता

जळगाव, दि.११ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. बुधवारी या महोत्सवाचा समारोप मोठ्या जल्लोषात झाला. या महोत्सवात ११८९ सहभागी विद्यार्थ्यांपैकी ४७५ विद्यार्थी व ७१३ विद्यार्थिंनींचा सहभाग होता.

दि.७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात युवारंग युवक महोत्सव झाला. बुधवारी सिने कलावंत सुरभी हांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अध्यक्षस्‍थानी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे उपस्थित होते. यावेळी के.सी.ई. संस्थेचे पदाधिकारी ॲङ प्रविणचंद्र जंगले, ज्ञानदेव पाटील, भालचंद्र पाटील, प्राचार्य ए. आर. राणे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, प्रा. एस. टी. भुकन, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, डॉ. पवित्रा पाटील, सी.ए. रवींद्र पाटील तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य स.ना. भारंबे, समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे, डॉ. मनोज महाजन यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना सुरभि हांडे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विविध प्रश्नांना उत्तरे देतांना त्या म्हणाल्या की, आयुष्यात खुपदा संधी प्राप्त होत असते. नेमकी संधी कोणती हे कळायला हवे. स्वत:शी स्पर्धा करा. आज केलेल्या अभिनयापेक्षा अजून काय उत्तम करता येईल याचा मी विचार करत असते. लहान गावातून मुंबईत गेल्यानंतर करीअर करतांना पुन्हा गावाकडे परतायचे नाही हे डोक्यात ठेवा. स्पर्धेतील सहभागामुळे आत्मविश्वास वाढतो. सोशल मिडीयाचा फायदा तरूण पिढीला होत आहे. मी मूळजी जेठा महाविद्यालयात शिकत असतांना शिक्षकांकडून खूप काही शिकले. त्याच महाविद्यालयात माझे कौतुक होत आहे याचा खुप आनंद आहे असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर व प्रा. योगेश महाले यांनी केले तर समन्वयक प्रा. जुगलकिशोर दुबे यांनी आभार मानले.

Next Post
जादा मोबदला मिळविण्यासाठी धरणात गेलेल्या जमिनीवर आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक

जादा मोबदला मिळविण्यासाठी धरणात गेलेल्या जमिनीवर आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add