• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना फैलावर घेतले

महामार्गालगत कचऱ्याचे ढीग, नाल्यात थर्माकोल; ओपन स्पेसमधील अतिक्रमणे हटविण्याचे सक्त निर्देश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 2, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना फैलावर घेतले

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासह अतिक्रमणांच्या समस्यांवर कारवाई करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (२ नोव्हेंबर) ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत वॉर्ड क्रमांक १६ मध्ये पाहणी दौरा केला. जुने जळगाव, ट्रान्सपोर्ट नगर, साई पार्क आणि लक्ष्मीनारायण नगर परिसरात पाहणी करताना ठिकठिकाणी आढळलेली अस्वच्छता, रस्त्यांवरील बांधकाम साहित्य, नाल्यांतील कचरा आणि ओपन स्पेसमध्ये उभी केलेली वाहने पाहून त्यांनी संबंधित अधिकारी व दुकानदारांना धारेवर धरले. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

या दौऱ्यात स्थानिक नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके, रंजना वानखेडे, वंदना इंगळे, हर्षल मावळे, प्रदीप रोटे, नरेंद्र सोनवणे यांच्यासह आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे तसेच पाणीपुरवठा, बांधकाम आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जुन्या जळगावातील विठ्ठल मंदिर परिसराची पाहणी करताना महापौरांनी नळांच्या तोट्यांची तपासणी करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या. अमृत योजनेअंतर्गत प्रलंबित नळजोडण्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांनी ते त्वरित हटवावे, असे आदेश देण्यात आले.

कोल्हे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या नाल्यात थर्माकोलचे बॉक्स मोठ्या प्रमाणात साचल्याचे पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. एमआयडीसी परिसरातून हा कचरा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोकलेनच्या साहाय्याने नाल्यातील कचरा व शेवाळ तातडीने काढण्याचे निर्देश दिले. नाल्याशेजारी असलेल्या वापरात नसलेल्या शौचालयाची तपासणी करून ते हटविण्याची सूचनाही त्यांनी केली.

ट्रान्सपोर्ट नगरात महामार्गालगत कुशनचा मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आढळला. दुकानांसमोरील रस्त्यांवर वाहनांच्या तुटलेल्या काचा आणि भंगार साचल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती. याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले. कचरा आणि अस्वच्छतेमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

ट्रान्सपोर्ट नगरातील मार्केट परिसरातील ओपन स्पेसमध्ये डंपर आणि जुनी वाहने उभी करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. यावर महापौरांनी संबंधित दुकानदारांना खडसावत वाहने तातडीने हटविण्याचे आदेश दिले. अन्यथा महापालिकेच्या माध्यमातून जागा मोकळी करून घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महानगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे सहन केली जाणार नाहीत, असे स्पष्ट करत या भागात रस्ता नसल्यामुळे नागरिकांसह महिलांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींचीही त्यांनी दखल घेतली.

साई पार्कजवळ नाल्यालगत असलेल्या घराभोवती संरक्षण भिंत बांधण्याबाबत बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या. ट्रान्सपोर्ट नगरजवळील ‘रेड स्वस्तिक’च्या रिकाम्या जागेत महापालिकेच्या विविध विभागांची कार्यालये उभारण्याची शक्यता तपासण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

लक्ष्मीनारायण नगरात नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, नाल्यांची नियमित स्वच्छता करावी आणि पथदिव्यांबाबतच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश देत महापौरांनी संबंधित विभागांना कामात दिरंगाई न करण्याची सूचना केली.


 

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना फैलावर घेतले
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना फैलावर घेतले

November 2, 2026
वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर
गुन्हे

वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

November 2, 2026
डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड
आरोग्य

डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड

November 2, 2026
‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’
जळगाव जिल्हा

‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’

November 2, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड
Uncategorized

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

November 2, 2026
ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

November 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add