• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 2, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’

जळगाव, प्रतिनिधी : येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी  ‘नेक्सस२के २६’ हा फ्रेशर्स सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.गौरव भोई यांची मि.फ्रेशर्स तर कुमदिनी महाजन यांची मिस फ्रेशर्स म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी फाउंडेशनचे सदस्य, प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, प्रमुख पाहुणे मोटर वेहिकल इन्स्पेक्टर, जळगाव आरटीओ तथा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २०१४ बॅचचे माजी विद्यार्थी निलेश पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे निलेश पाटील यांनी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या काळातील आठवणींना उजाळा देत प्रथम व द्वितीय वर्षात योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व, सातत्याने स्वतःच्या कौशल्यांमध्ये वाढ करणे, वेळेचे योग्य नियोजन आणि विविध छंद जोपासणे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक जीवनात सॉफ्ट स्किल्स आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी महाविद्यालय सदैव त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक उपक्रम आणि सादरीकरणांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, गौरव इंगळे, जिज्ञासा पाटील, संकेत बागड, सोनम गुंजाळ, मोहित चौधरी, रिद्धी भिरूड, राजश्री यादव, लल्लेश पाटील, निखिल पाटील, प्रणाली पाटील, ऋषिकेश पाटील, स्नेहल पाटील, हितेश चौधरी, मोहिनी जोशी, दिया चौधरी, चेतन चौधरी आणि आदेश जैस्वाल यांनी केले.

संगणक अभियांत्रिकीचा गौरव भोई मिस्टर फ्रेशर, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशनची कुमुदिनी महाजन मिस फ्रेशर विजेते ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक वर्ग यांनी नियोजन केले. आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) यांनी कौतुक केले.


 

ताज्या बातम्या

‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’
जळगाव जिल्हा

‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’

November 2, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड
Uncategorized

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

November 2, 2026
ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

November 2, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

पोलीस लाईन परिसरातून २० लाखांचा डंपर चोरीला

November 2, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अल्पवयीन पत्नीने बालिकेला जन्म दिल्यानंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल

November 2, 2026
भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक
गुन्हे

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

November 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add