भडगाव, प्रतिनिधी : भडगाव शहरातील पोलीस लाईन परिसरातून सुमारे २० लाख रुपये किमतीचा डंपर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीस गेलेला डंपर टाटा सिग्मा कंपनीचा असून त्याची किंमत अंदाजे २० लाख रुपये आहे. डंपरचे नवीन पासिंग झालेले असल्याने त्यावर कायमस्वरूपी क्रमांकाची प्लेट नव्हती. मात्र, वाहनावर यूपी ३२ एटीसी ७०६ हा क्रमांक नमूद असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रसुधीर किटकुल सोनवणे (वय ५१, व्यवसाय नोकरी), नायब तहसीलदार, रा. साईनगर, भडगाव यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहेत. चोरीस गेलेल्या डंपरचा शोध सुरू असून अद्याप चोरट्याची ओळख पटलेली नाही.









