• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

महापौर दीपमाला काळे यांचा वॉर्ड क्रमांक १७ येथे दौरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 3, 2026
in राजकीय, सामाजिक
0
अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

जळगाव :जळगाव शहर महानगरपालिकेच्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) महापौर दीपमाला काळे यांनी वॉर्ड क्रमांक १७ मधील विविध भागांना भेट देऊन पाहणी केली.

या वेळी स्थानिक नगरसेवक इब्राहिम पटेल, अक्षय वंजारी, जरीना शब्बीर शाह, हीनाबी शाकीरखान, माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे तसेच पाणीपुरवठा, विद्युत व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिराजवळ पाहणी करताना, तेथील जुन्या मुत्रालयामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने ते तातडीने काढून टाकण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

तसेच त्या मोकळ्या जागेवर नागरिकांना बसण्यासाठी बाकडे टाकण्यास सांगितले व परिसरातील गटारी स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.एमआयडीसी रस्त्यावरील जुन्या बुरुजसमोर महानगरपालिकेच्या जागेवर गाई-म्हशींचे गोठे उभारल्याचे आणि अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित व्यक्तींना चांगलेच धारेवर धरले. तसेच तिथे पसरवलेल्या अस्वच्छतेबद्दल त्यांना जागीच दंड ठोठावण्यात आला आणि ती ओपन स्पेस तात्काळ मोकळी करून घेण्याचे आदेश दिले

.लक्ष्मी नगरमधील गटारी नाला साफ करून तिथे कल्वर्ट टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. या भागातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याबाबत नागरिकांच्या यापूर्वीच तक्रारी असूनही कारवाई न झाल्याने, महापौरांनी संताप व्यक्त करत तात्काळ नाला साफ करून कल्वर्ट टाकण्याचे आदेश दिले.दत्तनगर परिसरामध्ये प्रलंबित असलेली गटारींची कामे पूर्ण करून ओव्हरफ्लो होणाऱ्या सर्व गटारी तातडीने साफ करून घेण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. या अभियानामुळे नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


 

ताज्या बातम्या

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
राजकीय

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
पारोळ्यात महिलेचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा बीडमधून गजाआड!
गुन्हे

पारोळ्यात महिलेचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा बीडमधून गजाआड!

November 3, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत छाननीचा धक्का ; संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद
खान्देश

जिल्हा बँक निवडणुकीत छाननीचा धक्का ; संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद

November 3, 2026
वॉर्ड १५ मधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर महापौरांचे तातडीने कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

वॉर्ड १५ मधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर महापौरांचे तातडीने कारवाईचे आदेश

November 3, 2026
महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर

November 2, 2026
वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर
गुन्हे

वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

November 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add