• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

कृषी अभियांत्रिकीतील उल्लेखनीय योगदानाची दखल; श्रीनगर येथे आयएसएईतर्फे पुरस्कार प्रदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

श्रीनगर, विशेष प्रतिनिधी : कृषी अभियांत्रिकी, तांत्रिक नवोपक्रम आणि शाश्वत शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चरल इंजिनिअर्स (आयएसएई) तर्फे जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. श्रीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात आयएसएईचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने वरिष्ठ सहकारी व कृषी अभियंता सोमनाथ जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला.

सूक्ष्मसिंचनापासून आधुनिक शेती तंत्रज्ञानापर्यंत विविध क्षेत्रांत जैन इरिगेशनने केलेल्या कामगिरीची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. प्रिसिजन फार्मिंग, संरक्षित शेती आणि हवामानपूरक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेती अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि शाश्वत बनविण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे.

ठिबक व तुषार सिंचन, फर्टिगेशन, हवामानपूरक कृषी उपाययोजना, हरितगृहे, प्रगत टिश्यू कल्चर लागवड साहित्य, सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन प्रणाली आणि आधुनिक जलव्यवस्थापन तंत्रज्ञान अशा विविध उपायांचा समावेश असलेली एकात्मिक कृषी तंत्रज्ञान प्रणाली जैन इरिगेशनने विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतीतील संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास आणि बदलत्या हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे.

‘मोअर क्रॉप पर ड्रॉप’ अर्थात कमी पाण्यात अधिक उत्पादन हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. या संकल्पनेनुसार पाणी आणि पोषक घटकांचा काटकसरीने वापर, पिकांची उत्पादकता वाढविणे, लागवडीचा खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक परतावा मिळवून देणे यावर कंपनीचा भर आहे. हरितगृह शेती, उच्च तंत्रज्ञानाधारित फलोत्पादन आणि शाश्वत कृषी पद्धतींच्या प्रसारातून संसाधनांचा योग्य वापर करणाऱ्या शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.

हवामानातील बदल आणि वाढती पाणीटंचाई या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जैन इरिगेशनची हवामानपूरक तंत्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. संशोधन, तांत्रिक नवोपक्रम आणि प्रत्यक्ष शेतातील अंमलबजावणी यांची सांगड घालत कृषी अभियांत्रिकी आणि शेतीतील प्रत्यक्ष गरजा यांच्यातील दरी कमी करण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे.

जैन इरिगेशनकडे ८०० हून अधिक तज्ज्ञ कृषी अभियंत्यांची समर्पित टीम असून, तंत्रज्ञान विकास, शेतकरी प्रशिक्षण आणि आधुनिक कृषी पद्धतींचा प्रसार करण्यात या टीमचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कृषी क्षेत्रातील या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत मिळालेला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ हा कंपनीच्या तांत्रिक क्षमता आणि शाश्वत शेतीसाठीच्या प्रयत्नांचा गौरव मानला जात आहे.


 

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add