• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 10, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

जळगाव, प्रतिनिधी : अपघातात डोक्याला जबर मार लागून मेंदूच्या आवरणाबाहेर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव (ईडीएच) झालेल्या तरुणावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. नवी जबाबदारी नव्या पर्वाची सूरूवात करणाऱ्या प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया महादेव रुग्णालयातील मेंदूवरील पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.

२७ वर्षीय रेलसिंग याला अपघातानंतर संबंधित तरुणाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी महादेव रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी गोदावरी फॉउंडेशनची धुरा नव्याने सांभाळणारे नवे पर्व प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी केली. रक्तस्त्रावामुळे मेंदूवर दाब निर्माण होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे निदान झाले. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अतुल जाधव, डॉ. श्रुती खंडागळे, डॉ. प्रितम दास यांच्या पथकाकडून डिकॉम्प्रेसिव्ह क्रेनिओक्टोमी पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान कवटीचा आवश्यक भाग उघडून मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यात आला तसेच साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले. अपघातानंतरची गंभीर परिस्थिती लक्षात घेता उपचारातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता.

त्यामुळे रुग्णाला तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात आले.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली असून उपचारांना प्रतिसाद मिळत आहे. अपघातग्रस्त रुग्णाच्या मेंदूला झालेली गंभीर दुखापत वेळेत ओळखून योग्य निदान व तातडीची शस्त्रक्रिया केल्यामुळे पुढील संभाव्य गुंतागुंत टाळण्यास मदत झाली.

▪️डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मेंदूच्या आवरणाबाहेर रक्त साचल्यास मेंदूवर दाब वाढू शकतो. अशा परिस्थितीत रुग्णाचे तातडीने सीटी स्कॅन करून योग्य निदान करणे आणि गरज असल्यास वेळ न दवडता शस्त्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या रुग्णाच्या बाबतीत वेळेत निदान झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करता आली.
– डॉ. अनिकेत उल्हास पाटील, न्युरोसर्जन, डॉ.उल्हास पाटील रूग्णालय.

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add