• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

४ ऑक्टोबरला आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक मार्गावर सहा तास वाहतूक वळविणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 3, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

४ ऑक्टोबरला आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक मार्गावर सहा तास वाहतूक वळविणार

जळगाव, प्रतिनिधी : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने रविवारी, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.

या मोर्चासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार चंद्रकांत हंडोरे, दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार आदी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता बंदोबस्ताचा आढावा घेतला. मोर्चाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यकतेनुसार वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.

आकाशवाणी चौकाकडून न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने तसेच एस.टी. बसेस आकाशवाणी चौक–कवयित्री बहिणाबाई उद्यान–रिंगरोड–गोकुळ स्वीटमार्ट–शाहू कॉम्प्लेक्स या मार्गाने वळविण्यात येतील.

न्यायालय चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहने आणि एस.टी. बसेस न्यायालय चौक–शाहू कॉम्प्लेक्स–गोकुळ स्वीटमार्ट–रिंगरोड–कवयित्री बहिणाबाई उद्यान–आकाशवाणी चौक या पर्यायी मार्गाने जातील.

नेरी नाक्याकडून स्वतंत्र चौकाकडे येणारी वाहने नेरी नाका–पांडे चौक–सिव्हिल हॉस्पिटल–बेंडाळे चौक–चित्रा चौक–न्यायालय चौक या मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

प्रभात चौकाकडून नेरी नाका किंवा न्यायालय चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी प्रभात चौक–कवयित्री बहिणाबाई उद्यान–रिंगरोड–गोकुळ स्वीटमार्ट–शाहू कॉम्प्लेक्स–न्यायालय चौक–चित्रा चौक–बेंडाळे चौक–नेरी नाका हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

मोर्चाच्या कालावधीत नागरिक आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चाच्या मार्गावर अनावश्यकपणे वाहने आणू नयेत तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन
खान्देश

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

October 3, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
Uncategorized

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026
भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add