• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

४ ऑक्टोबरला आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक मार्गावर सहा तास वाहतूक वळविणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 4, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

जळगाव, प्रतिनिधी : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने आज रविवारी, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.

या मोर्चासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार चंद्रकांत हंडोरे, दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार आदी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. मोर्चाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यकतेनुसार वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. आकाशवाणी चौकाकडून न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने तसेच एस.टी. बसेस आकाशवाणी चौक–कवयित्री बहिणाबाई उद्यान–रिंगरोड–गोकुळ स्वीटमार्ट–शाहू कॉम्प्लेक्स या मार्गाने वळविण्यात येतील.

न्यायालय चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहने आणि एस.टी. बसेस न्यायालय चौक–शाहू कॉम्प्लेक्स–गोकुळ स्वीटमार्ट–रिंगरोड–कवयित्री बहिणाबाई उद्यान–आकाशवाणी चौक या पर्यायी मार्गाने जातील. नेरी नाक्याकडून स्वतंत्र चौकाकडे येणारी वाहने नेरी नाका–पांडे चौक–सिव्हिल हॉस्पिटल–बेंडाळे चौक–चित्रा चौक–न्यायालय चौक या मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

प्रभात चौकाकडून नेरी नाका किंवा न्यायालय चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी प्रभात चौक–कवयित्री बहिणाबाई उद्यान–रिंगरोड–गोकुळ स्वीटमार्ट–शाहू कॉम्प्लेक्स–न्यायालय चौक–चित्रा चौक–बेंडाळे चौक–नेरी नाका हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

मोर्चाच्या कालावधीत नागरिक आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चाच्या मार्गावर अनावश्यकपणे वाहने आणू नयेत तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

Next Post
धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add