जळगाव, प्रतिनिधी : विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआरच्या फेज-१ मध्ये अॅनमॅपिंग मतदार तसेच लॉजिकल डिस्क्रेपन्सीज असलेल्यामतदारांच्या नोंदींची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित नागरिकांच्या घरी बीएलओ किंवा एईआरओ पथकांकडून संपर्क साधला जाईल.

आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर नोंदीचे मॅपिंग अथवा विसंगतीचे निराकरण झाल्यास स्वतंत्र सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही. प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव नसल्यास नमुना ६ भरून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल.

प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.









