• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

लहान, मोठे गट मिळून ५१ संघांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 3, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन, सामाजिक
0
भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

जळगाव, प्रतिनिधी : लोप पावत चाललेल्या लोकपरंपरेचे जतन आणि संवर्धन करतानाच त्याला आधुनिक सामाजिक संदेशांची जोड देणारा जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव शुक्रवारी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ललित कला संवर्धिनीच्या वतीने आयोजित या महोत्सवाच्या अंतिम फेरीत छोट्या गटात २१, मोठ्या गटात २० आणि खुल्या गटात १० संघांनी सहभाग घेतला.

महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी मायादेवी मंदिरापासून भुलाबाई दिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, भुलाबाईची गाणी आणि टिपऱ्यांच्या तालात निघालेल्या दिंडीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभात जळगाव जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव दिलीप चोपडा तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रतिनिधी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

भुलाबाईच्या पारंपरिक गीत, नृत्य, टिपऱ्या आणि सामूहिक सादरीकरणातून यंदा सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी जागर करण्यात आला. सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन, सण-उत्सवांचे महत्त्व, कौशल्याधारित शिक्षण, शिक्षणाचा दर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर अशा विविध विषयांवर मुली आणि महिलांनी गीतांच्या माध्यमातून संदेश दिले. पारंपरिक भुलाबाईच्या गीतांमधून ग्रामीण जीवन, नातेसंबंध, संस्कृती आणि लोकमानसाचे दर्शन घडवितानाच आजच्या काळातील प्रश्नांवर भाष्य करण्यात आले. त्यामुळे लोककलेचे जतन आणि समाजप्रबोधन यांचा सुरेख संगम या महोत्सवात पाहायला मिळाला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ महाराष्ट्राच्या महिला व बालविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, आमदार राजूमामा भोळे, संस्थेचे सचिव दिलीप चोपडा, भुलाबाई महोत्सव प्रमुख वैशाली कोळंबे आणि रेखा कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मेघना बोर्डीकर यांनी मुलींनी स्वसंरक्षणासोबतच कौशल्याधारित शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. मुली आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी राहील, असे त्यांनी सांगितले. भुलाबाईसारख्या लोककलेचे जतन केवळ जळगावपुरते मर्यादित न राहता मराठवाड्यातही या परंपरेला व्यासपीठ मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले. जळगावच्या भुलाबाई महोत्सवाला भेट दिल्यानंतर या लोककलेचे महत्त्व अधिक जाणवल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्पर्धेच्या छोट्या गटाच्या शहरी विभागात विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, जळगावने प्रथम, जिव्हाळा ग्रुप, सावखेडा यांनी द्वितीय तर विद्या विकास मंदिरने तृतीय क्रमांक मिळविला. रोझलँड प्राथमिक विद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ग्रामीण विभागात मायक्रो व्हिजन ग्रुप, सावदा प्रथम, आदित्य इंग्लिश मीडियम, रावेर द्वितीय तर विवेकानंद विद्यालय, चोपडा तृतीय ठरले. प्रमिलाताई पूर्णपात्रे विद्यालय, चाळीसगावला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. मोठ्या गटाच्या शहरी विभागात बाल विश्व प्राथमिक शाळा, जळगाव प्रथम, बघू शानबाग विद्यालय द्वितीय आणि लाना सार्वजनिक विद्यालय तृतीय ठरले. रोजी आणि इंग्लिश स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ग्रामीण विभागात प्रताप विद्या मंदिर, चोपडा प्रथम, उल्हास पाटील स्कूल, सावदा द्वितीय आणि इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, साकेगाव, भुसावळ तृतीय ठरले. उमेश्वर महादेव विद्यालय, रावेरला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुपने प्रथम, राधा राणी ग्रुपने द्वितीय आणि भवानी ग्रुपने तृतीय क्रमांक मिळविला. संस्कृती ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ग्रामीण विभागात शिवशक्ती ग्रुप, भुसावळ प्रथम, आदिशक्ती ग्रुप, चोपडा द्वितीय आणि राजपूत महिला मंडळ, रावेर तृतीय ठरले. संस्कृती गट, सावदाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. यंदा प्रथमच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, सावदा, भुसावळ, चोपडा आणि रावेर या पाच ठिकाणी तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून निवड झालेले संघ जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभागी झाले.

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ललित कला संवर्धिनीच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून भुलाबाई महोत्सवाच्या माध्यमातून लोप पावत चाललेल्या लोकपरंपरेचे जतन आणि संवर्धन केले जात आहे. बदलत्या जीवनशैलीच्या काळातही नव्या पिढीला आपल्या लोककला आणि सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचा हा प्रयत्न असून, यंदाच्या व्यापक सहभागामुळे महोत्सवाला अधिक मोठे स्वरूप प्राप्त झाले.


 

ताज्या बातम्या

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add