• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 3, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, प्रतिनिधी : खरगाव येथील लंगाडा अंबा परिसरातील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरूणाच्या मेंदूला अपघातामुळे झालेल्या गंभीर दुखापतीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले. डॉक्टरांची तत्परता आणि वेळ या दोन्ही गोष्टी या शस्त्रक्रियेत महत्वाच्या ठरल्या.

याबाबत माहिती अशी की, लंगडाअंबा परिसरातील दयाराम बारेला (२४) यांना रस्ते अपघातात गंभीर अपघात होऊन डोक्याला दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी दयाराम बरेला हे बेशुद्ध अवस्थेत होते. याठिकाणी मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी त्यांच्या प्रकृतीची तातडीने तपासणी करून उपचार सुरू करण्यात आले.

रुग्णाची एनसीसीटी ब्रेन तपासणी करण्यात आली. या तपासणीत डोक्याच्या डाव्या कपाळाच्या भागात डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर म्हणजेच कवटीचे हाड तुटून आतल्या बाजूला दाबले गेल्याचे आढळून आले. तसेच फ्रॅक्चरच्या खालील भागात मेंदूला कंट्युजन म्हणजे दुखापतीमुळे मेंदूच्या ऊतींना झालेली जखम असल्याचे निदान झाले. रुग्ण बेशुद्ध असल्याने तसेच मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रुग्णाला पुढील गुंतागुंत होऊ नये आणि मेंदूवरील दाब कमी करता यावा, यासाठी त्याच दिवशी डीकम्प्रेसिव्ह क्रेनिएक्टॉमी विथ इव्हॅक्युएशन ऑफ हेमॅटोमा ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्याबरोबरच साचलेले रक्त (हेमॅटोमा) बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णावर वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. पोस्ट-ऑपरेटिव्ह काळात कोणतीही मोठी गुंतागुंत झाली नाही. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला बेशुद्ध अवस्थेत असलेला रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. विपूल राठोड यांना डॉ. प्रितम दास व टीमने सहकार्य केले. तसेच ही शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.

▪️रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर तज्ज्ञ वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. बेशुद्धावस्था, डोक्याला गंभीर मार, उलट्या, झटके किंवा प्रतिसाद न देणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. दयाराम बरेला यांच्या प्रकरणात वेळेत रुग्णालयात दाखल करून आवश्यक तपासण्या आणि तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे.
– डॉ. प्रितम दास, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

Next Post
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त 'साप वाचवा, निसर्ग वाचवा'चा जागर

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
Uncategorized

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026
भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add