• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 23, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

​जळगाव, प्रतिनिधी :

एकीकडे डोक्यावर असलेली कर्जफेडीची चिंता आणि दुसरीकडे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान, या दुहेरी आर्थिक विवंचनेतून विदगाव (ता. जळगाव) येथील दिव्यांग शेतकरी गजानन पद्माकर पाटील (वय ४८) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग असतानाही गजानन पाटील हे अत्यंत जिद्दीने शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शेतीच्या कामासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र, यंदा निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून ते तीव्र मानसिक तणावाखाली व आर्थिक अडचणींचा सामना करत होते.

​याच नैराश्यातून त्यांनी २१ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे विदगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

ताज्या बातम्या

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या
खान्देश

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

November 23, 2026
प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार
खान्देश

प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार

November 23, 2026
नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन
कृषी

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
क्रिडा

धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

November 23, 2026
मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 23, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा
जळगाव जिल्हा

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा

November 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add