जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाऊंडेशनच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. भक्तिमय वातावरणात विधिवत पूजा-अर्चा करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी परिचारिका अधीक्षक संकेत पाटील, मनीषा खरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्यासह डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील, प्राचार्य शिवानंद बिरादार तसेच सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत गणेशाची स्थापना करण्यात आली.
महादेव हॉस्पिटलमध्येही माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी रुग्णालय व्यवस्थापक प्रा. एन. जी. चौधरी यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
डीजेविरहित गणेशोत्सवाच्या संकल्पातून सामाजिक संदेश देत गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये गणेशोत्सवाला भक्ती आणि सामाजिक जाणीवेची जोड देण्यात आली आहे.








