• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

गोदावरीच्या खेळाडूंची सुवर्णपदकांची चमक; जम्मू-काश्मीर येथे होणार्‍या अखिल भारतीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 4, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांमधील सुमारे ३० पुरुष व २५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली.

पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत सेबर, एपी आणि फॉइल या तीन प्रकारांत चुरशीचे सामने रंगले. उद्घाटनप्रसंगी इ अँड टे विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे, डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), प्रा. मुकुंद शिरसाठ, प्रा. मनोज राठोड आणि एनआयएस फेन्सिंग प्रशिक्षक पायल मोरकर विविध विभागांचे प्रमुख तसेच प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी डॉ. हेमंत इंगळे यांनी खेळातून केवळ पदके किंवा विजय मिळत नाही, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

सेबर पुरुष गटात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तेजस पाटील सुवर्णपदक महिला गटात सायली पाटील सुवर्णपदक, साक्षी उबाळे कांस्यपदक मिळविले. एपी पुरुष गटात सिद्धांत विधाते (डॉ. व्ही. के. पाटील सीओईटी, छत्रपती संभाजीनगर) सुवर्णपदक, तर गोदावरीच्या मयूर कोळी रौप्यपदक पटकावले. एपी महिला गटात गोदावरीच्या वैष्णवी साबळे रौप्यपदक मिळविले. फॉइल पुरुष गटात सिद्धार्थ विधाते सुवर्णपदक, तर गोदावरीच्या तुषार पाटील कांस्यपदक पटकावले. फॉइल महिला गटात गोदावरीच्या सोनम गुंजाळ सुवर्णपदक, तर निसर्गा पाटील कांस्यपदक मिळवून महाविद्यालयाच्या यशात भर घातली. अखिल भारतीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवडया स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विद्यापीठाच्या संघासाठी विविध खेळाडूंची निवड करण्यात आली.

पुरुष राखीव गटात एपीसाठी शिवराज भोसले (एमजीएम, नांदेड), फॉइलसाठी अंकुश सामुद्रे (डी. एन. पटेल, शहादा) आणि सेबरसाठी दत्ता कपाटे (एमजीएम, नांदेड) यांची निवड झाली. महिला राखीव गटात एपीसाठी विशाखा सुरवाडे (गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय), फॉइलसाठी रोशनी सूर्यवंशी आणि सेबरसाठी कृपा सूर्यवंशी (डी. एन. पटेल, शहादा) यांची निवड करण्यात आली. निवड झालेले पदकविजेते खेळाडू जम्मू-काश्मीर येथे आयोजित होणार्‍या अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव आणि प्रा. नकुल गाडगे यांनी स्पर्धेच्या नियोजनात व आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजश्री यादव हिने केले.या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्व पदकविजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 

Next Post
पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू
खान्देश

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
जळगाव जिल्हा

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 4, 2026
पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश
खान्देश

पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

November 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

November 4, 2026
गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद
जळगाव जिल्हा

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद

November 4, 2026
एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात
जळगाव जिल्हा

एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात

November 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add