• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

कामाच्या संथगतीबद्दल नाराजी व्यक्त करत थेट 'लाइव्ह डेमो'चे आदेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 4, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेत बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) वॉटर मीटरच्या कामकाजासंदर्भात महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरात वॉटर मीटर बसवणाऱ्या कंपनीच्या संथ आणि मनमानी कारभारावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

जळगाव शहरात वॉटर मीटर बसवण्याचा मक्ता ‘खिल्लारी सॉफ्टवेअर टेक्निकल, मुंबई’ या कंपनीला देण्यात आला आहे. मात्र, या कामकाजाची माहिती वेळोवेळी महापालिकेला पुरवणे अपेक्षित असताना ती देण्यात आलेली नाही. तसेच कंपनीने महापालिकेशी कुठलाही समन्वय ठेवलेला नाही, याबाबत महापौरांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

शहरात बसवण्यात आलेल्या वॉटर मीटरमधून पाणी गळती होत असल्याच्या आणि पाण्याचा फोर्स (दाब) कमी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय, वॉटर मीटरची नेमकी कार्यपद्धती काय आहे, याबाबत अद्यापही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना किंवा महापालिकेला कोणतीही माहिती दिलेली नाही, हा मुद्दा बैठकीत गांभीर्याने चर्चेला आला.

वॉटर मीटर बसवण्याचे कामकाज अतिशय कासवगतीने आणि संथ गतिने सुरू असल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदारांच्या या सुस्त कारभारावर ताशेरे ओढत महापौरांनी वॉटर मीटरचा ‘लाइव्ह डेमो’ (प्रत्यक्ष कार्यप्रणाली करून दाखवणे) देण्याचे सक्त आदेश दिले. तसेच, आतापर्यंत जळगाव शहरात नेमकी किती वॉटर मीटर बसवण्यात आली आहेत, याची अधिकृत आकडेवारी तात्काळ सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे अभियंता घृष्णेश्वर साळुंखे, खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ठेकेदार मृत्युंजय सिंग, प्रकल्प सल्लागार लोमेश भोळे, साईट इंजिनिअर राकेश पाटील, गौरव गोरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.


 

Next Post
जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू
खान्देश

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
जळगाव जिल्हा

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 4, 2026
पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश
खान्देश

पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

November 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

November 4, 2026
गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद
जळगाव जिल्हा

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद

November 4, 2026
एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात
जळगाव जिल्हा

एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात

November 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add