• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

गोंदेगावजवळील दुर्दैवी घटना; पाचोरा, पहूर परिसरात हळहळ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 16, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

पाचोरा l प्रतिनिधी

पोषण आहार योजनेचे धान्य घेऊन पाचोऱ्याकडून जामनेरच्या दिशेने जाणाऱ्या ४०७ मालवाहू टेम्पोचे अचानक मागील चाकाचे टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघातात टेम्पोच्या मागील भागात धान्याच्या गोण्यांवर बसलेले दोन हमाल रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (१५ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गोंदेगावजवळील ऋषीबाबा मंदिर परिसरात हा अपघात झाला.

मृतांमध्ये पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील जगदीश लालचंद पाटील (४१) आणि बहिरम नगर येथील अर्जुन तुकाराम पाटील (५२) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोषण आहार योजनेचे धान्य घेऊन ४०७ मालवाहू टेम्पो (एमएच १४ एफ ३५०४) मंगळवारी सकाळी पाचोऱ्याहून जामनेरच्या दिशेने रवाना झाला होता. टेम्पोच्या मागील भागात धान्याच्या गोण्यांवर जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील हे दोन्ही हमाल बसले होते.

गोंदेगावजवळ ऋषीबाबा मंदिराजवळ पोहोचताच वाहनाच्या मागील चाकाचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टायर फुटल्याने वाहनाचा वेग आणि तोल बिघडल्याने मागील भागातील दोन्ही हमाल गाडीबाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पहूर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण दात्रे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.

दोघांचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे तपास करीत आहेत.

अपघातात दोन कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाचोरा, पहूर आणि शेंदुर्णी परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, पाचोऱ्यातून नेण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य नेमके कोणत्या केंद्रासाठी होते, त्याच्या वाहतुकीचे कंत्राट कोणाकडे होते, वाहनाची स्थिती कशी होती आणि वाहतूक करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताची जबाबदारी निश्चित करून मृत हमालांच्या कुटुंबीयांना संबंधितांकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही होत आहे.

Next Post
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारला अन् भावांवर दगडफेक

ताज्या बातम्या

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 16, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारला अन् भावांवर दगडफेक

September 16, 2026
टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू
गुन्हे

टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

September 16, 2026
गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add