• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

पावसाच्या व्यत्ययानंतरही कार्यकर्त्यांची तयारी अंतिम टप्प्यात; जिल्ह्यात १७३ ठिकाणी 'एक गाव, एक गणपती'

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 14, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

​जळगाव I प्रतिनिधी : मंगलमूर्ती श्री गणरायाचे आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये थाटामाटात आगमन होत असून, संपूर्ण जळगाव जिल्हा गणेशोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरात अत्यंत भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले.

जिल्ह्यात यंदा २ हजार ९९० गणेश मंडळांची अधिकृत नोंद झाली असून, त्यामध्ये २,१६४ सार्वजनिक तर ६५३ खासगी मंडळांचा समावेश आहे. एकट्या जळगाव शहरात ४०७ मंडळे बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असून, त्यातील २१६ सार्वजनिक मंडळे आहेत.

सजावट, रोषणाई आणि देखावे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग पराकोटीला पोहोचली होती. ​गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे सजावट आणि मूर्ती रक्षणासाठी मूर्तिकार व कार्यकर्त्यांची मोठी कसरत झाली. मात्र, या प्रतिकूल हवामानावर मात करत ताडपत्रीच्या साहाय्याने सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात आली.

जिल्ह्यात सामाजिक सलोखा वाढीस लागावा म्हणून तब्बल १७३ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवण्यात येत असून एमआयडीसी व तालुका हद्दीत १० ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे.

संपूर्ण उत्सव काळात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत सुमारे ५ हजार पोलिसांचा ताफा आणि २५०० हून अधिक होमगार्ड जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात आज गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे.

ताज्या बातम्या

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली
गुन्हे

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add