• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

महापौरांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

जळगाव, प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या मानाच्या श्री गणपतीची भव्य आगमन मिरवणूक सोमवारी शिवतीर्थ मैदानापासून अत्यंत उत्साहपूर्ण आणि डीजेमुक्त वातावरणात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीची सुरुवात शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे आणि अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून झाली.

शिवतीर्थ मैदानापासून निघालेली ही मिरवणूक महानगरपालिकेच्या प्रांगणापर्यंत वाजत-गाजत पोहोचली. मिरवणुकीत आमदार, महापौरांसह सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. ढोल-ताशांच्या तालावर पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धरलेला ठेका आणि जल्लोष शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला.

महानगरपालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात मिरवणुकीचा निरोप घेऊन श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. महापौर दीपमाला काळे आणि माजी नगरसेवक मनोज काळे या दांपत्याच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा-अर्चा करून स्थापना करण्यात आली.

याप्रसंगी आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महाआरती पार पडली.

या सोहळ्याला उपायुक्त धनश्री शिंदे, शिवसेनेचे गटनेते तथा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना (ठाकरे गट) गटनेत्या अर्शीनबानो शोएब खाटीक, भाजप उपगटनेते नितीन बरडे, डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, राजेंद्र घुगे पाटील, उज्वला बेंडाळे, ॲड. शुचिता हाडा, नगरसेवक सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, विशाल भोळे, महिला व बालकल्याण समिती सदस्य गायत्री राणे, सुरेखा तायडे, विद्या सोनवणे यांच्यासह वैशाली पाटील, पियुष कोल्हे, अमर जैन, विजय बांदल, कल्पेश सोनवणे, नितीन सपके, वंदना इंगळे, मानसी भोईटे, डॉ. नरेंद्र पाटील, अंकिता पाटील, जयश्री पाटील, अनिता भापसे, आशा पाटील, रबियाबी अमजद खान, नलुबाई सोनवणे, अनिल अडकमोल, रिटा सपकाळे, निलेश तायडे, प्रवीण कोल्हे, कविता पाटील, रितिक ढेकळे, अक्षय वंजारी, स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी, प्रदीप रोटे, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add