• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

वजनातील 'घोटाळा' रोखण्यासाठी थेट उपमहापौरांच्या दालनात दिसणार सीसीटीव्ही लाईव्ह स्क्रीन!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा आणि काही ठराविक अधिकारी व ठेकेदारांच्या फायद्यासाठी जळगावकर जनतेच्या कराच्या पैशांची होत असलेली उधळपट्टी अखेर थांबली आहे. उपमहापौर मनोज चौधरी यांनी गेल्या दोन महासभेत वजन काट्याबाबत वारंवार केलेल्या सुचना आणि पाठपुराव्याला अखेर यश आले असून, कचरा डेपो येथील मनपाच्या स्वतःच्या मालकीचा वजन काटा अखेर सुरू करण्यात आला आहे.

कचरा डेपोवर मनपाचा स्वतःचा वजन काटा उपलब्ध असतानाही, केवळ तीन लाख रुपयांच्या किरकोळ दुरुस्तीअभावी तो धूळ खात पडला होता. याचाच गैरफायदा घेत मनपा प्रशासनाने खाजगी वजन काट्याला लाखो रुपयांची बिले अदा केली होती. स्वतःच्या मालकीची यंत्रणा असताना केवळ काही निवडक अधिकारी आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच जळगावकरांच्या टॅक्सच्या पैशांचा हा अपव्यय सुरू असल्याबद्दल उपमहापौर मनोज चौधरी यांनी महासभेत तीव्र खंत आणि संताप व्यक्त केला होता.

अखेर उपमहापौरांच्या दबावानंतर प्रशासनाला जाग आली असून कचरा डेपोवरील वजन काटा सुरू करण्यात आला आहे. आता या वजन काट्यावर पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या सीसीटीव्हीचा थेट ॲक्सिस उपमहापौर मनोज चौधरी यांच्या दालनातील स्क्रीनवर लाईव्ह दिसणार आहे. यामुळे कचऱ्याच्या वजनात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील घोळ आणि आर्थिक गैरव्यवहाराला पूर्णपणे आळा बसणार आहे.

‘टीबी हाऊस’चा काटाही लवकरच सुरू होणार..
कचरा डेपोच्या काट्यासोबतच, शहरातील ‘टीबी हाऊस’ येथे असलेला आणि सध्या धूळ खात पडलेला दुसरा वजन काटाही तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या महसुलाची होणारी गळती रोखण्यात आता मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.


 

Tags: #municipalcorporationJalgaon
Next Post
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add