• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 18, 2026
in जळगाव जिल्हा
0
प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील संत गजानन कॉलनी आणि शिवधाम मंदिराच्या मागील परिसरात गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत उपमहापौर मनोज सुरेश चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी या परिसराला प्रत्यक्ष भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली.

पाहणी दरम्यान साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेता, उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. “साचलेले सांडपाणी उपसण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने पाईपलाईन टाकून हा रस्ता मोकळा करण्यात यावा,” अशा कडक सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

यावेळी लोकप्रतिनिधींसोबत महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक महेश ठाकूर, बांधकाम इंजिनियर विशाल सुर्वे मनपाचे इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add