• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सातगाव फाट्यावर गावरान पिस्तुलसह आरोपी जेरबंद; पिंपळगाव हरे पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 13, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सातगाव फाट्यावर गावरान पिस्तुलसह आरोपी जेरबंद; पिंपळगाव हरे पोलिसांची कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध हत्यारे व अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्याचे आदेश जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरे पोलिसांनी शनिवारी (दि. १३) सातगाव (ता. पाचोरा) शिवारात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे एक गावरान बनावटीचे पिस्तूल (मॅग्झिनसह) जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला रंगेहात अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​किशोर लक्ष्मण पाटील (वय ३२, रा. सार्व पिंप्री, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ​पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ​शनिवार, दि. १३ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.

​सदरची यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरे स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा, पोहेकॉ अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहेरे, अमोल पाटील, प्रमोद वाडीले आणि नामदेव इंगळे यांच्या पथकाने केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

Tags: #jalgaondistrictCrimePolice
Next Post
‘जनसेवा हीच राष्ट्रसेवा’ मानणारे आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!

'जनसेवा हीच राष्ट्रसेवा' मानणारे आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!

ताज्या बातम्या

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add