• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू, १८ जून रोजी मतदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 20, 2026
in Uncategorized
0
जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू, १८ जून रोजी मतदान

​जळगाव, (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची अधिकृत घोषणा केली असून, जिल्ह्यात १८ मे २०२६ पासून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

​या निवडणुकीच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, २५ मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून, २ जून रोजी अर्जांची छाननी होईल. ४ जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल, तर सोमवार, २२ जून रोजी जिल्हास्तरावर मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

​निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे कामकाज पाहत आहेत. उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात कार्यालयीन दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. या निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १०,००० रुपये, तर अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना ५,००० रुपये अनामत रक्कम (डिपाझिट) ठेवावी लागणार आहे. तसेच उमेदवाराचे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात असणे बंधनकारक आहे.

​या निवडणुकीत जळगाव महानगरपालिकेचे कार्यरत सदस्य, जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींचे निर्वाचित व स्वीकृत असे एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतपत्रिकेद्वारे पसंती क्रमाने हे मतदान होणार असून, त्यासाठी जिल्ह्यात ७ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

​दरम्यान, ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट १९९५’ नुसार विनापरवाना सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर लावणे, भिंती रंगवणे किंवा झेंडे लावण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे. असे आढळल्यास संबंधित व्यक्ती ३ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा २ हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील. त्यामुळे राजकीय पक्षांनी त्वरित अशी अनधिकृत फलके व पोस्टर्स काढून घ्यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणीचे ठिकाण आणि सुरक्षा कक्ष जिल्हास्तरावर प्रस्तावित करण्यात आले असून, आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे.


 

Tags: #political
Next Post
NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन

NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात 'महाविकास आघाडी'च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add