• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन

​जळगाव, (प्रतिनिधी) : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पुणे येथील मॉडर्न कॉलेजच्या महिला प्राध्यापिकेपर्यंत पोहोचले असून, यात मोठे संघटित रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज, बुधवारी (२० मे) जळगावात महाविकास आघाडीच्या युवक संघटनांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. युवासेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने एम. जे. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात आले.

​राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेच्या नावावर अवाढव्य शुल्क आकारते, तरीही परीक्षांचे पेपर फुटतातच कसे? असा सवाल करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि ‘एनटीए’च्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध करणारे फलक हातात घेऊन आणि घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनादरम्यान महाविद्यालय परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची टांगाटोळी करत त्यांना पोलीस गाड्यांमध्ये डांबले आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेले.

​लाखो विद्यार्थ्यांच्या न्याय्य भावना शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने करण्यात आल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. हे आंदोलन मविआ युवक संघटनेचे पदाधिकारी विराज कावडीया, रिंकू चौधरी, मुजीब पटेल, विनायक पाटील, प्रितम शिंदे आणि गौरव वाणी यांच्या नेतृत्वात पार पडले.

​​या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गुलाबराव वाघ, शरद तायडे, अशोक लाडवंजारी, शाम तायडे, निलेश चौधरी, सुनिल माळी, भाऊसाहेब सोनवणे, संग्राम सुर्यवंशी, शोएब खाटीक, जाकिर बागवान, आकिब शेख, बाबा देशमुख, आकाश हिवाळे, ॲड. अविनाश महिरे, चेतन पवार, पारस तायडे, रोहीत जंगले, अजय खैरनार, मुजक्कीर शेख, अजय वंजारी, विशाल पवार, गौरव डांगे, कुणाल हटकर, घनशाम लोहार, मच्छिंद्र निकम आदींसह मविआचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पेपरफुटीच्या या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळस करण्यात आली.

Next Post
‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव

‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव

ताज्या बातम्या

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक
जळगाव जिल्हा

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक

July 4, 2026
जामनेरमधील ९ लाखांची घरफोडी उघड; ३ आरोपींना अटक, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जामनेरमधील ९ लाखांची घरफोडी उघड; ३ आरोपींना अटक, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 4, 2026
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ
आरोग्य

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

July 3, 2026
संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
खान्देश

संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 3, 2026
एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली
गुन्हे

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

July 3, 2026
कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी
जळगाव जिल्हा

कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी

July 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group