• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव

​जळगाव, (प्रतिनिधी) : शिक्षकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणा व नवी ऊर्जा देणारा ‘विनोबा’ उपक्रमांतर्गत एप्रिल २०२६ महिन्याचा जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ गौरव सोहळा जळगावात उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या शुभहस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

​या सोहळ्यात जिल्ह्यातील शिक्षकांचा ‘पोस्ट ऑफ द मंथ’, ‘स्पेलिंग बी’, ‘महावाचन – कविता व कथा सादरीकरण’ आणि ‘सकाळची सभा’ या विविध उपक्रमांमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. “हा उपक्रम केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील इतर शिक्षकांना प्रेरित करणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

​पुरस्कारप्राप्त गुणवंत शिक्षक खालीलप्रमाणे..
​‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार: अश्विनी कांबळे (जि. प. शाळा देऊळगाव, ता. जामनेर), योगिता साहेबराव बडगुजर (जि. प. शाळा रायपूर, ता. रावेर), रूपाली मोरे (जि. प. मुलींची शाळा अडावद, ता. चोपडा), रेखा पाटील (जि. प. शिवाजी आदर्श शाळा हातेड बुद्रुक, ता. चोपडा) आणि कविता वाघ (जि. प. शाळा जळू, ता. एरंडोल).
​‘स्पेलिंग बी’ स्पर्धा: वैशाली बोरसे (पारोळा), विजय बागुल (धरणगाव), मनीषा अहिरे (यावल), राहुल पाटील (चोपडा),  चंद्रकांत विसपुते (जामनेर), नीता काकर (मुक्ताईनगर) आणि पल्लवी शिंदे (चोपडा).
​‘महावाचन – कविता सादरीकरण’: शितल सोनार (धरणगाव), अनिता शिंगारे (जामनेर), उमा वानखेडे (एरंडोल) आणि जितेंद्र पाटील (रावेर).
​‘महावाचन – कथा सादरीकरण’: विनोद धनगर (पाचोरा), शितल पाटील (एरंडोल) आणि शारदा पाटील (भुसावळ).
​‘सकाळची सभा’ उपक्रम: योगिता लोखंडे (जि. प. केंद्र प्राथमिक शाळा पिंपरी खुर्द, ता. धरणगाव) यांनी उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान पटकावला.

​या गौरव सोहळ्याला विनोबाचे जिल्हा समन्वयक हितेश भालेराव व सचिन ससाणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अत्यंत यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि ‘विनोबा’ टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Next Post
अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

ताज्या बातम्या

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक
जळगाव जिल्हा

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक

July 4, 2026
जामनेरमधील ९ लाखांची घरफोडी उघड; ३ आरोपींना अटक, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जामनेरमधील ९ लाखांची घरफोडी उघड; ३ आरोपींना अटक, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 4, 2026
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ
आरोग्य

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

July 3, 2026
संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
खान्देश

संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 3, 2026
एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली
गुन्हे

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

July 3, 2026
कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी
जळगाव जिल्हा

कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी

July 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group