• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 1, 2026
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!

​चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरा येथे आगामी एप्रिल महिन्यात अध्यात्म आणि भक्तीचा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे. सकल हिंदू समाज आणि सतपंथ ज्योत मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री महाविष्णू याग, श्री दशावतार मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि भव्य धर्म संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संपूर्ण धानोरा नगरी भक्तिमय झाली असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

​२० एकर जागेत सोहळ्याची भव्यता..
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जागेची अडचण ग्रामस्थांच्या दातृत्वातून सुटली आहे. सूर्यवंशी गुजर समाज मंदिरासमोरील सुमारे २० एकर विस्तीर्ण जागेत हा सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक शेतकरी बांधवांनी ही जागा कोणत्याही शुल्काशिवाय या धार्मिक कार्यासाठी उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

​ग्रामस्थांचे श्रमदान आणि नियोजन..
सोहळ्याची पूर्वतयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मैदानाची स्वच्छता आणि मंडपाच्या उभारणीसाठी गावातील तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक दररोज श्रमदान करत आहेत. दिवसा प्रत्यक्ष मैदानावर तयारी आणि रात्री परिसरातील गावांमध्ये जाऊन जनजागृती व प्रचार करण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे. महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरी महाराज यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली यज्ञशाळा, मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी आणि धर्म संमेलनाचे शास्त्रोक्त नियोजन केले जात आहे.

​जातिभेद विसरून गाव एकवटले..
या महोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व भेद विसरून संपूर्ण हिंदू समाज ‘एक गाव, एक परिवार’ या भावनेने एकत्र आला आहे. आयोजक म्हणून सकल हिंदू समाज महाराष्ट्र आणि निमंत्रक म्हणून सतपंथ ज्योत मंदिर, धानोरा या कार्यात अग्रभागी आहेत.

​कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे:
​९ एप्रिल: हभप गोविंद महाराज गायकवाड (आळंदी) यांचा ‘भारूड’ कार्यक्रम.
​१० एप्रिल: प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या मूर्तींची भव्य ग्राम प्रदक्षिणा.
​११ ते १३ एप्रिल: विश्वकल्याणासाठी ‘श्री महाविष्णू याग’ विधी.
​१३ एप्रिल: महोत्सवाचा मुख्य सोहळा – ‘श्री दशावतार मूर्ती प्राणप्रतिष्ठा’.
​१४ एप्रिल: विविध संप्रदायांच्या संत-महंतांच्या उपस्थितीत भव्य ‘धर्म संमेलन’.

​हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत आयोजकांनी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
​


 

Next Post
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add