• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

८० लिटर क्षमतेचा अत्याधुनिक वॉटर कुलर भेट; 'त्याग त्यांचा, सेवा आमची' भावनेतून उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 2, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

जळगाव, (प्रतिनिधी ) : “भारत माता की जय” चा जयघोष करणाऱ्या आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वीर सैनिकांच्या कुटुंबियांची व मुलांची सेवा करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशा भावना लिनेस क्लब जळगावच्या अध्यक्षा रेखा वर्मा यांनी व्यक्त केल्या. निमित्त होते, लिनेस क्लबतर्फे माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाला देण्यात आलेल्या ८० लिटर क्षमतेच्या अत्याधुनिक वॉटर कुलरच्या भेट कार्यक्रमाचे.

​‘त्याग त्यांचा, सेवा आमची’ या ब्रीदवाक्याला जागत लिनेस क्लबने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुनील रायसोनी यांच्यातर्फे आणि विजूताई बाफना यांच्या विशेष सहकार्यातून हे वॉटर कुलर वसतिगृहाला प्राप्त झाले आहे. वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आता शुद्ध, स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

​या सुविधेचे उद्घाटन क्लबच्या पूर्व प्रांत अध्यक्ष लता बनवट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर क्लबच्या सेक्रेटरी नीला चौधरी, माजी अध्यक्ष रेशमा बेहराणी, प्रोजेक्ट डायरेक्टर विजूताई बाफना, ज्येष्ठ सदस्य अनिता कांकरिया आणि माजी अध्यक्ष चंद्रकला सुराणा यांची प्रमुख उपस्थिती होती.

​वसतिगृहाचे अधिकारी संजयजी गायकवाड आणि समाधानजी धनगर यांनी लिनेस क्लबच्या या दातृत्वाचे कौतुक करत आभार मानले. “अशा सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात मोलाची मदत होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. ​कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. समाजातील विविध स्तरांवर असेच सेवाकार्य यापुढेही निरंतर सुरू राहील, अशी ग्वाही यावेळी क्लबतर्फे देण्यात आली.


 

Next Post
शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add