• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 24, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

चाळीसगाव ,प्रतिनिधी : चौधरीवाडी परिसरात एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ नोव्हेंबरच्या रात्री उघडकीस आली. अरबाज खान आसिफ खान (रा. संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयांच्या बदल्यात ४० हजार रुपयांची मागणी करून धमक्या दिल्यामुळेच मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी ललित अशोक चौधरी (रा. घाटरोड, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मृत अरबाज हा ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. २० नोव्हेंबर रोजी तो दुचाकीने चाळीसगाव येथे आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर २२ नोव्हेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना समोर आली.

धमक्या व पैशांच्या तगाद्याचा आरोप घेतलेल्या २० हजार रुपयांच्या मोबदल्यात संबंधित व्यक्तीकडून ४० हजार रुपयांची मागणी केली जात होती आणि त्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. याच त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप फिर्यादी वडिलांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


 

Next Post
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

November 24, 2026
व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल
खान्देश

व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

November 24, 2026
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड

November 24, 2026
जेठाणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पतीला जन्मठेप, मुलाला दोन लाखांची भरपाई
गुन्हे

जेठाणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पतीला जन्मठेप, मुलाला दोन लाखांची भरपाई

November 24, 2026
विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार
जळगाव जिल्हा

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार

November 23, 2026
जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत

November 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add