आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली
मुंबई प्रतिनिधी : गणेशोत्सवाबरोबरच धार्मिक मिरवणुका, सण-उत्सव व इतर समारंभांमध्ये लेझर बीम आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनी प्रणालीचा वापर करण्यावर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने २०२० च्या ध्वनिप्रदूषण नियमावलीतील आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या लाऊडस्पीकर व इतर साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांना योग्य प्राधिकरणाकडे दाद मागावी, असे निर्देश दिले.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवात डीजे, इस्पीकर वाजण्याचा मार्ग झाला आहे. ध्वनिप्रदूषणामुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होतात. असा दावा करून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.