• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बसस्थानकावर महिलेची ३० हजारांची सोनपोत लांबविली; चोरटे पुन्हा सक्रिय!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 25, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बसस्थानकावर महिलेची ३० हजारांची सोनपोत लांबविली; चोरटे पुन्हा सक्रिय!

​जळगाव, (प्रतिनिधी) : एस.टी. बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची धक्कादायक घटना जळगाव येथील नवीन बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बसस्थानक परिसरात चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वर्दी येथील रहिवासी रमण कौतिक पाटील (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी यमुनाबाई रमण पाटील हे जळगाव येथील एका रुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला पाहण्यासाठी आले होते. रुग्णाची भेट घेतल्यानंतर हे दांपत्य घरी परत जाण्यासाठी जळगाव येथील नवीन बसस्थानकावर आले. २२ मे रोजी नवीन बसस्थानकातून चोपडा येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.

​याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यमुनाबाई पाटील यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची आणि सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अत्यंत चालाखीने लांबविली. बसमध्ये चढल्यानंतर काही वेळातच हा प्रकार यमुनाबाई यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने ही बाब आपले पती रमण पाटील यांना सांगितली. त्यांनी तात्काळ बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र चोरट्यांचा आणि सोन्याच्या पोतीचा कुठेही पत्ता लागला नाही.

​धक्क्याने महिलेची प्रकृती खालावली..
कष्टाची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे समजताच यमुनाबाई पाटील यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे हवालदिल झालेले हे वृद्ध दांपत्य तक्रार न करताच थेट आपल्या गावी घरी निघून गेले. त्यानंतर, या धक्क्यातून सावरत रमण पाटील यांनी २३ मे रोजी जळगाव गाठून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags: #jalgaon_cityCrimeJalgaonPolice
Next Post
पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add