• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 7, 2026
in आरोग्य
0
१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

जळगाव, (प्रतिनिधी) : गंभीर अवस्थेत बेशुद्ध झालेल्या १० वर्षीय चिमुकलीवर महादेव सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ आणि अतिदक्षता विभागाच्या डॉक्टरांनी वेळेत व योग्य उपचार करून तिचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिस या जीवघेण्या आजाराचे वेळेत निदान करून दिलेल्या उपचारांमुळे बालिका पूर्णपणे धोक्याबाहेर आली आहे.

१० वर्षीय बालिकेला अचानक प्रकृती खालावल्याने ती बेशुद्ध झाली. तिला तातडीने महादेव सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल होताच बालरोग तज्ज्ञांनी तिची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान बालिकेला फिट्स (आकडी) येऊ लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. तातडीने आवश्यक रक्त तपासण्या व इतर वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.

तपासणी अहवालानुसार बालिकेला डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिस हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. शरीरातील इन्सुलिनची तीव्र कमतरता झाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीरात आम्लयुक्त ’कीटोन्स’ तयार होतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्ण बेशुद्ध होणे, मेंदूवर परिणाम होणे, अवयव निकामी होणे किंवा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन महादेव रुग्णालयातील बालरोग विभाग व अतिदक्षता विभागाच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. बालिकेला अतिदक्षता विभागात हलवून सतत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तिच्यावर वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार योग्य द्रवोपचार, इन्सुलिन थेरपी, इलेट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक उपचार तसेच इतर पूरक उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान तिच्या रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, श्वसन, हृदयाची गती आणि इतर महत्त्वाच्या जैविक घटकांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.

डॉटरांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि वेळेवर सुरू करण्यात आलेल्या उपचारांमुळे बालिकेच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. काही दिवसांच्या उपचारानंतर ती पूर्णपणे शुद्धीवर आली. त्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाल्याने आवश्यक वैद्यकीय सल्ल्यासह तिला सुखरूप घरी सोडण्यात आले.

महादेव सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता सुविधा, अनुभवी बालरोग तज्ज्ञ, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि २४ तास उपलब्ध आपत्कालीन सेवा यामुळे अशा गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. या यशस्वी उपचारामुळे पुन्हा एकदा महादेव रुग्णालयाने रुग्णकेंद्रित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा विश्वास कायम राखला आहे. बालिकेवर डॉ. सिध्दांत घोलप, डॉ. सुनील पाटील, डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनुने, डॉ. नावेद खान, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. मिमोनी कुंभारे, डॉ. विशाल कोठावले यांनी यशस्वी उपचार केले.

▪️डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिस ही मधुमेहाची अत्यंत गंभीर गुंतागुंत असून विशेषतः मुलांमध्ये ती जीवघेणी ठरू शकते. सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन झपाट्याने कमी होणे, उलट्या, पोटदुखी, अशक्तपणा, झोप येणे, श्वासाचा वेगळा वास किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तज्ज्ञ डॉटरांचा सल्ला घ्यावा.


 

Next Post
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add