• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी शहरातील पेट्रोल पंपावर भेट देऊन इंधन साठा व पुरवठा परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते.

यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पुरवठा विभाग तसेच आयओसीएल (IOCL), बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल (HPCL), नायरा (Nayara) आणि रिलायन्स (Reliance) या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळची जी स्टॉक पोझिशन आहे ती १९९० किलोलिटरची स्टॉक पोझिशन आपल्याकडे डिझेलच्या संदर्भामध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलच्या साठ्यामध्ये काहीही कमतरता नाही आहे आणि पेट्रोल बाबत पॅनिक सुद्धा नाही आहे. पॅनिक हे आपल्या काही ठिकाणी डिझेलच्या बाबतच होते. तर १९९० केएल (KL) ची आपल्याकडे सप्लाय आहे, त्याच्या अगेन्स्ट आपल्या येथे १५५० केएल च्या आसपास मागणी आहे आणि ट्रान्झिटमध्ये जो येणारा साठा आहे, आपल्याकडे १७६० किलोलिटरचा जो साठा आहे तो ट्रान्झिटमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या चार दिवसांच्या तुलनेत एका दिवसातच मोठ्या प्रमाणावर डिझेलची विक्री होत असल्याने काही ठिकाणी पुरवठ्यावर ताण जाणवत असल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदविले आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यातील साठा पर्याप्त असून येणारा पुरवठादेखील मुबलक असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये, पॅनिक बायिंग करू नये, खुल्या कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल घेऊन जाणे टाळावे. अत्यावश्यक परिस्थितीतच सुरक्षित कंटेनरचा वापर करून इंधन घ्यावे, असे आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांनी साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे स्पष्ट केले. सर्व पेट्रोल पंपांवर महसूल, पुरवठा व पोलीस विभागाकडून नियमित गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लावणीच्या हंगामामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी आवश्यक तेवढे पेट्रोल-डिझेल पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे इंधनाचा अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नसून गरजेनुसार पुरवठा सुरळीत सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.


 

Tags: #petrolpump
Next Post
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add