• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

आसोदा उड्डाणपुलाजवळ गळफास घेत आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 7, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

आसोदा उड्डाणपुलाजवळ गळफास घेत आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव, प्रतिनिधी : मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणातून धमक्या व मानसिक त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देऊळवाडा (ता. जळगाव) येथील प्रशांत संजय सोनवणे (वय २८) याच्याबाबत घडली. आसोदा उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संदीप महाजन, त्याचा भाऊ विशाल महाजन आणि आई अशा तिघांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सोनवणे याच्या मावस बहिणीचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला प्रशांतचा विरोध होता. याच कारणातून संशयितांकडून प्रशांतला वाटेत अडवून धमकावणे, अपमानित करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे प्रशांत मानसिक विवंचनेत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिरामागे शेताच्या बांधावर त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add