• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ

भडगाव, प्रतिनिधी : तालुक्यातील कजगाव येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोडगाव ते कजगाव रोडवरील सोलर प्लान्टजवळ एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कजगाव येथील रहिवासी जयेश नाना धोबी (पवार) हा तरुण पारोळा रस्त्यावरील सोलर कंपनीत कामासाठी जात असताना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गोडगाव ते कजगाव रोडवरील सोलर प्लान्टजवळ त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.

दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून मुन्ना उर्फ गिरीष मुक्तारसिंग राजपूत व अन्य दोघांनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गोळीबारात जयेश पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

### पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

जखमी जयेश पवार यांच्या पत्नी दिव्या जयेश पवार (रा. कजगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित मुन्ना उर्फ गिरीष मुक्तारसिंग राजपूत व अन्य दोन व्यक्तींविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, भडगावचे पोलीस निरीक्षक महेश टाक, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे कजगावसह परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

ताज्या बातम्या

कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; बालचमूंसाठी चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; बालचमूंसाठी चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद
गुन्हे

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add