• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

पहलगाम हल्ल्याशी संबंध असल्याचे सांगून धमकावले; सायबर पोलिसांनी २७ लाख रुपये रोखले

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 28, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

पहलगाम हल्ल्याशी संबंध असल्याचे सांगून धमकावले; सायबर पोलिसांनी २७ लाख रुपये रोखले

जळगाव, प्रतिनिधी : पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा बनाव करून मुंबई एटीएसचे अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या सायबर भामट्यांनी सावदा येथील ५३ वर्षीय शिक्षकाला ३२ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला. अटक आणि बदनामीची भीती दाखवून शिक्षकाकडून टप्प्याटप्प्याने पैसे उकळण्यात आले. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत २७ लाख रुपये रोखण्यात यश मिळवले.

रावेर तालुक्यातील सावदा येथील शिक्षक २९ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांना विशाल ठाकूर नावाच्या व्यक्तीचा व्हॉट्सॲप कॉल आला. मुंबई एटीएसमधील पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगणाऱ्या या व्यक्तीने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे शिक्षकांच्या नावावरील मोबाइल क्रमांक आढळल्याचे सांगितले. शिक्षकांच्या आधारकार्डचा वापर करून बँक खाते उघडण्यात आले असून, त्यात सात कोटी रुपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला. यातील अडीच लाख रुपये शिक्षकांनी घेतल्याचा आरोप करून त्यांना कारवाईची भीती दाखवण्यात आली.

सायबर भामट्यांनी शिक्षकाला घरी जाऊन बंद खोलीत बसण्यास सांगितले. तसेच आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांना दर तासाला माहिती देण्याच्या सूचना केल्या. ३० ऑक्टोबर रोजी पुन्हा व्हिडिओ कॉल करून अटक आणि बदनामी टाळायची असेल, तर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

भीतीपोटी शिक्षकाने सुरुवातीला तीन लाख रुपये पाठवले. त्यानंतरही मागणी थांबली नाही. त्यामुळे त्यांनी एसआयपी आणि अन्य बचत प्रमाणपत्रे मोडून वेळोवेळी पैसे पाठवले. एकूण ३२ लाख ४० हजार रुपये उकळल्यानंतरही भामट्यांनी शिक्षकाला सोडले नाही. पाठवलेले पैसे काळ्या पैशांशी संबंधित असल्याचे सेबीच्या तपासात निष्पन्न झाल्याचा बनाव करून पोलीस, ईडी आणि इतर तपास यंत्रणांच्या नावाने आणखी पैसे मागण्यात आले.

२९ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार सुरू होता. वारंवार पैसे मागितले जात असल्याने शिक्षकाला संशय आला आणि त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी विशाल ठाकूर आणि मनोजकुमार शर्मा या नावांचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीची दखल घेत सायबर पोलिसांनी संबंधित बँक खात्यांची तपासणी केली. फसवणुकीच्या एकूण ३२ लाख ४० हजार रुपयांपैकी २७ लाख रुपये रोखण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.


 

ताज्या बातम्या

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना
गुन्हे

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

November 28, 2026
रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add