• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

दारूच्या नशेत २३ वर्षीय तरुणाची हत्या; केऱ्हाळ्यात ६२ वर्षीय संशयित ताब्यात 

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 7, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

रावेर, प्रतिनिधी : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील केऱ्हाळे गावातील इंदिरानगर परिसरात मंगळवारी (६ ऑक्टोबर) दुपारी घडली. मिस्तरी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडर मशीनच्या कटरने गळ्यावर वार केल्याने २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी ६२ वर्षीय इसमाला रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजू रवींद्र कापडे (वय २३, रा. इंदिरानगर, केऱ्हाळे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर रामसिंग चिंधू भिल (वय ६२, रा. इंदिरानगर, केऱ्हाळे) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामसिंग भिल हा मिस्तरी काम करतो आणि इंदिरानगर परिसरात एकटाच राहत असल्याचे सांगण्यात येते. मृत राजू कापडे हा त्याला जेवणाचा डबाही आणून देत असल्याची माहिती आहे. मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास राजू हा रामसिंगच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते.

यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. शिवीगाळीनंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर रामसिंग याने मिस्तरी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडर मशीनच्या कटरने राजूच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजू गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित रामसिंग भिल याला ताब्यात घेतले. दरम्यान, झालेल्या मारहाणीत रामसिंग यालाही दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमागील नेमके कारण, वादाची सुरुवात कशावरून झाली आणि हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम याबाबत रावेर पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने केऱ्हाळे गावातील इंदिरानगर परिसरात खळबळ उडाली आहे.

Next Post
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

ताज्या बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add