• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी पेलले आव्हान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 25, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

जळगाव, (प्रतिनिधी) : हृदयविकाराचा त्रास असलेल्या २२ वर्षीय गर्भवती महिलेची अतिजोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ, मेडिसीन विभाग तसेच बालरोग तज्ज्ञ यांच्या समन्वयातून आई आणि बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या यशस्वी उपचारामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

याबाबत माहिती अशी की, वरणगाव येथील निकीता नामक २२ वर्षीय महिला दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रसूतीसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र तिला यापूर्वीपासूनच हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याने तिची प्रसूती अतिजोखमीची मानली जात होती. गर्भधारणेदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येत असल्याने आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी तिची तपासणी केली.

तसेच विशेष दक्षता घेत तातडीने हृदयविकार तज्ज्ञ आणि मेडिसीन तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलेची विविध तपासण्या करून तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रसूतीदरम्यान हृदयाची गती, रक्तदाब आणि ऑक्सिजनचे प्रमाण सतत तपासण्यात आले. अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. संस्कृती भिरूड, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे या टीमने ही अतिजोखमीची प्रसूती सुरक्षितपणे पार पडली.

प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली तिच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले. नवजात शिशुलाही आवश्यक उपचार आणि निरीक्षणासाठी बालरोग विभागात दाखल करण्यात आले. सध्या आई आणि बाळाची प्रकृती समाधानकारक आहे.

▪️हृदयविकार असलेल्या गर्भवती महिलांची प्रसूती ही नेहमीच मोठे आव्हान असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर ताण वाढण्याचा धोका असतो. मात्र सर्व विभागांच्या समन्वयातून आणि योग्य नियोजनामुळे ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. वेळेवर उपचार आणि सतत निरीक्षण यामुळे आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवणे शक्य झाले.
– डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
जळगावात युवक काँग्रेसचे आंदोलन; ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासाची मागणी

जळगावात युवक काँग्रेसचे आंदोलन; 'नीट'च्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासाची मागणी

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add