• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेत ‘प्रशासन राज’; नगरसेवकांचा नाशिक दौरा रद्द

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेत ‘प्रशासन राज’; नगरसेवकांचा नाशिक दौरा रद्द

​जळगाव, (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जळगाव महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना पूर्णपणे ब्रेक लागला आहे. पुढील महिनाभर महापालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासनाच्या नियंत्रणाखाली राहणार असल्याने राजकीय वर्तुळात ‘प्रशासन राज’ सुरू झाल्याची चर्चा आहे. आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीमुळे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची अधिकृत वाहने प्रशासनाकडे जमा करण्यात आली असून, ५ जून रोजी होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या शासकीय रॅलीमध्येही पदाधिकाऱ्यांना सहभागी होता येणार नाही.

​या आचारसंहितेचा थेट परिणाम महापालिकेच्या विकासकामांवर आणि नियोजित उपक्रमांवर होणार आहे. पुढील आठवड्यात होणारी स्थायी समितीची बैठक स्थगित करण्यात आली असून, महासभाही घेता येणार नाही. यामुळे निधी मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि विविध विभागांच्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास विलंब होणार असून विकासकामांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

​दरम्यान, महापालिकेच्या खर्चातून नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला नगरसेवकांचा दोन दिवसीय प्रशिक्षण दौराही प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत रद्द केला आहे. २२ मे रोजी सर्व नगरसेवक ई-बसने नाशिकला रवाना होणार होते, मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने हा दौरा रद्द करावा लागला आहे.

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
‘तो’ फोन ठरला संजीवनी! जळगावात मृत्यूच्या दारातून डॉक्टरांनी रुग्णाला आणले खेचून..

'तो' फोन ठरला संजीवनी! जळगावात मृत्यूच्या दारातून डॉक्टरांनी रुग्णाला आणले खेचून..

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add