• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ४ मोटारसायकली हस्तगत

जळगावात एम.आय.डी.सी. पोलिसांची मोठी कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 23, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ४ मोटारसायकली हस्तगत

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत मोटारसायकल चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण १ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी संतोष रणछोड सैंदाणे (वय ४७, रा. वाघ नगर, जळगाव) यांची होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच १९सी एल ७५५८) सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून अज्ञात चोराने चोरून नेली होती. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने पथक स्थापन करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळासह जळगाव शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज ‘नेत्रम’ कार्यालयातील पोकों मुबारक देशमुख यांच्या मदतीने तपासले.

​तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी १) महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. खोटे नगर, जळगाव) आणि २) मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६ वर्षे, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी क्रमांक १ याच्या ताब्यातून पोलिसांनी ४ दुचाकी हस्तगत केल्या असून एकूण १,८७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी.चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, पोकों गणेश ठाकरे, पोकों रमाकांत साळुंखे, पोकों शशिकांत मराठे, पोकों किरण पाटील, पोकों योगेश घुगे तसेच ‘नेत्रम’ येथील पोकों मुबारक देशमुख यांनी केली आहे.


 

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेत ‘प्रशासन राज’; नगरसेवकांचा नाशिक दौरा रद्द

आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेत ‘प्रशासन राज’; नगरसेवकांचा नाशिक दौरा रद्द

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add