नाशिक, दि.29 – जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधत शनिवारी नाशिक छायाचित्रकार संघटनेच्यावतीने शहरातील २९ जेष्ठ व उत्कृष्ट फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम व पारितोषिके मिळवलेल्या छायाचित्रकारांचा सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी १५० छायाचित्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांना “कोविडशिल्ड” चा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला. यासाठी नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अजिता साळुंखे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टेकर, डॉ. राजकुमार दायमा यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या कामाचा आलेख पाहता संघटनेन संदर्भात गौरवोद्गार काढले. त्याचबरोबर संघटनेने उत्तरोत्तर प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या.
सत्कारार्थी ज्येष्ठ छायाचित्रकार
अप्पा वाणी, नंदकुमार गोखले, अजित सारंग, रामचंद्र मोरे, बापू गहिवड, सुभाष दहिवेलकर, अर्जुन गुप्ता, अण्णा लकडे, शांताराम शिंपी, बाळू लोखंडे, राजा पाटेकर, प्रशांत खरोटे, प्रकाश नाशिककर, किशोर अहिरराव, सुभाष घुले, हिरामण सोनवणे, विकास जोशी, संतोष लाले, अरुण जाधव, मनोज अंबाडकर, संजय चौधरी, संजय अमृतकर, सोमनाथ कोकरे, किसन बेन्स, राजू जाधव, आनंद बोरा, प्रसाद पवार, बाबूसेठ ठाकूर, बळवंत पाटील, राजू नाकिल आदी ज्येष्ठ व उत्कृष्ट छायाचित्रकारांनचा सन्मान संघटनेच्यावतीने करण्यात आला.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हिरामण सोनवणे, अध्यक्ष संजय जगताप, सेक्रेटरी सुरेंद्र पगारे, उपाध्यक्ष पंकज अहिरराव, सहसेक्रेटरी नंदू विसपुते, सल्लागार प्रताप पाटील, वामनराव दंदी, सदस्य किरण मुर्तडक, दिनेश वैष्णव, विलास अहिरे, गिरिष भोळे, प्रशांत तांबट, धनराज पाटील, सौरभ अमृतकर, संदीप भालेराव, सुनील जगताप, रवींद्र गवारे, पंकज जोगळेकर, योगेश चव्हाण आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील छायाचित्रकार बांधव उपस्थित होते.