• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांवर आयुर्वेद ठरतंय वरदान; जळगावात अत्याधुनिक उपचार उपलब्ध!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 13, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांवर आयुर्वेद ठरतंय वरदान; जळगावात अत्याधुनिक उपचार उपलब्ध!

जळगाव, (प्रतिनिधी) : आधुनिक जीवनशैली, मधुमेह, अपघात तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. गुणवंतराव सरोदेे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे अत्याधुनिक आयुर्वेदिक जखम व्यवस्थापन सेवा उपलब्ध करून रुग्णांना प्रभावी उपचार दिले जात आहेत.

आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धतींचा समन्वय साधत येथे विविध प्रकारच्या जखमांवर उपचार केले जातात. विशेषतः मधुमेहामुळे होणार्‍या जखमा, शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा, बेडसोर्स, संसर्गजन्य जखमा तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत.

संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची संपूर्ण तपासणी करून वैयक्तिक उपचार योजना तयार केली जाते. आयुर्वेदिक औषधे, स्थानिक उपचार, पंचकर्मातील निवडक प्रक्रिया तसेच जखमांच्या नैसर्गिक भरून येण्याच्या प्रक्रियेला गती देणार्‍या पद्धतींचा वापर करून रुग्णांना आराम मिळत आहे.

संस्थेचे अधिष्ठाता व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल बोरोले यांनी सांगितले की, आयुर्वेदिक जखम व्यवस्थापन ही केवळ जखम भरून काढण्याची प्रक्रिया नसून रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याचे संतुलन साधण्यावर भर देणारी उपचारपद्धती आहे. त्यामुळे जखम लवकर भरून येण्यास, वेदना कमी होण्यास आणि पुनरावृत्ती टाळण्यास मदत होते. डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे गुणवत्तापूर्ण, परवडणारी आणि संशोधनाधारित आयुर्वेदिक आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या ध्येयाशी कटिबद्ध  सेवा रुग्णांना प्रदान करत आहे.

Next Post
भडगाव तालुका क्रीडा संकुलांची व पिंपळगाव हरेश्वर मंदिर परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

भडगाव तालुका क्रीडा संकुलांची व पिंपळगाव हरेश्वर मंदिर परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add