• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भडगाव तालुका क्रीडा संकुलांची व पिंपळगाव हरेश्वर मंदिर परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
भडगाव तालुका क्रीडा संकुलांची व पिंपळगाव हरेश्वर मंदिर परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव, (जिमाका) : पाचोरा उपविभागीय जनसमाधान कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भडगाव येथील क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा विभागांतर्गत येणाऱ्या भडगाव तालुका क्रीडा संकुलास भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या क्रीडा सुविधांची माहिती घेतली. भडगाव येथील बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच बास्केटबॉल मैदान, स्केटिंग रिंक आणि २०० मीटर धावनमार्गाच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

या कामांना गती देऊन, तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी क्रिडा विभागाला दिल्या. यावेळी त्यांनी सराव करणाऱ्या बाल खेळाडूंशी संवाद साधला व त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याचा संदेश दिला. विकासकामांच्या अंमलबजावणीत गती आणून नागरिकांना गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहील, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी सांगितले. तदपुर्वी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी पिंपळगाव हरेश्वर येथील श्रीहरी हरेश्वर मंदिर परिसरास भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीहरी हरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करताना मंदिराच्या जागेसंदर्भातील मागणी शासन स्तरावर मांडून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत व्यापक विकास करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या संवादादरम्यान जिल्हाधिकारी म्हणाले की, गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासनाकडून जे शक्य असेल ते करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा भुषण अहिरे, पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे, भडगावच्या तहसिलदार शितल सोलाट मंदिर देवस्थान ट्रस्टचे संचालक मंडळ आदी उपस्थीत होते.


 

Next Post
लेझर तंत्रज्ञानाचा चमत्कार! जळगावच्या ‘महादेव हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक RIRS शस्त्रक्रिया यशस्वी

लेझर तंत्रज्ञानाचा चमत्कार! जळगावच्या 'महादेव हॉस्पिटल'मध्ये अत्याधुनिक RIRS शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add